kenjalgad

Home

-----------------------------------------------------

चुन्याचा घाणा

(उर्फ कासलोसगड उर्फ केळंजा उर्फ मोहनगड)

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग उंची: 4269 फूट

जवळचे ठिकाण: भोर, वाई जिल्हा: सातारा

भीमाचे मंदीर किंवा दारुकोठार

सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांपैकी ज्या किल्ल्याच्यापाय-या फार श्रम करुन खोदलेल्या आहेत असा हाकेंजळगड आहे. महादेव डोंगराचा मांढरदेव नावाचा एकसुळका पुढे आलेला आहे त्यावर हा किल्ला बांधलेलाआहे.

गडावरुन दिसणारे दृश्य

पाण्याचा तलाव

केंजाई मंदीर

------------------------------------------------------------------

इतिहासः-

शिलाहार राजा भोज द्वितीय याने निर्मीलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक असा केंजळगड. हा प्राचीन दुर्ग शिवकाळात ओसपडला होता. हा भाग विजापूरच्या आदिलशाहीत येत होता. शिवाजीमहाराजांनी हा ओसाड गड वसवण्याचे ठरवले. त्यांनी हेकाम बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर सोपवले. इ. स. 1659 मध्ये महाराजांनी केंजळगड वसवला. पुढे सन 1666 मध्ये हा गडआदिलशाहीच्या ताब्यात आला. म्हणजे पुरंदरच्या तहानंतरच्या काळात कधीतरी हा आदिलशाही कडे आला असावा. 24 एप्रिल 1674 रोजी मराठ्यांनी सुलतानढवा केला, त्यात गडाचा नाईक गंगाजी विश्वासराव मारला गेला व गड मराठ्यांच्याताब्यात आला. 1701 मध्ये औरंगजेबाने जिंकलेला हा गड लगेच 1702 मध्ये मराठ्यांनी जिंकला. 1818 मध्ये इंग्रजानीबाकी किल्ल्यांबरोबर केंजळगड पण जिंकला.

कसे जावे:-

    1. भोरमार्गे:- पुणे- भोर हे अंतर साधारण 65-70 कि.मी आहे. भोरहून पायथ्याचे कोर्ले गाव 22-25 कि.मीअंतरावर आहे. गडावर पोचायला साधारण 2 तास लागतात.

    2. वाईमार्गे:- पुणे-वाई अंतर 85-90 कि.मी आहे. वाईहून साधारण 20 कि.मी लांब खावली गावात यावे. इथून गडचढायला दिड-दोन तासात गडावर जाणा-या सोंडेवर आपण पोचतो.

  1. रायरेश्वरमार्गे:- रायरेश्वरच्या देवळाच्या समोर उजवीकडच्या शेताच्या बांधावरून उतरावे. पठार संपल्यावर लोखंडीशिडी लागते. शिडी उतरल्यावर उजवीकडे खावली गाव दिसते. या मार्गाला श्वानदरा मार्ग म्हणतात. या वाटेने चालतगेल्यावर दोन-तीन तासात केंजळगडाच्या कातळापाशी आपण पोचतो.

गडावर काय आहे:- गडाचे आकारमान लहान आहे. केंजळगडाचा माथा केवळ 230 मीटर लांब, 92 मीटर रुंद आहे. अवशेष फार नाहीत. कातळाच्या अलीकडे एक गुहा लागते, त्यात काळ्या रंगाचे कोळी प्रचंड प्रमाणात आहेत. कोळ्यांचे पुजंकेगुहेच्या छ्तावरुन कोसळत असतात. कातळामध्ये खोदलेल्या 55 रुंद पाय-या चढुन बालेकिल्ल्यावर यावे. डावीकडे पाण्याचातलाव आहे. पश्चिमेकडे जाताना एक छत नसलेली इमारत लागते. याला भीमाचे मंदीर किंवा दारुकोठार पण म्हणतात. याच्याचारही भिंती शाबूत आहेत. आत मध्ये एक झाड पण आहे. छ्त बांधल्यास इथे 4-5 जणांची निवा-याची उत्तम सोय होऊशकते. जवळच मंदीराचे भग्नावशेष आहेत, केंजाई देवीची मूर्ती, नक्षीकाम केलेले दगड आहेत. गडावर दोन चांगल्या स्थितीतअसलेले चुन्याचे घाणे आहेत. पश्चिमेकडे पडझड झालेला बुरुज आहे, काही पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्ण गडावर कमरे इतकेगवत माजलेले आहे, त्यामुळे बांधकाम कुठे-कुठे केलेले आहे याचा अंदाज येत नाही. गडावरुन पश्चिम दिशेकडे बघितल्यासखाली खावली गाव, वाळकी नदी दिसते, उत्तरेकडे रायरेश्वराचे पठार दिसते तर दक्षिणेकडे कमळगड, पाचगणी वमहाबळेश्वरची पठारें दिसतात.

केंजाई मंदीर

कोळी गुहा

महत्त्वाचे:-

    1. गडावर राहण्याची सोय नाही, गडाखालच्या केंजळमाचीवरच्या केंजळाई मंदीरात 8-10 जण राहू शकतात.

    2. जेवणाची सोय आपली आपणच करावी.

    3. गडावरंच्या तलाव व टाक्यांमध्ये पाणी फक्त पावसाळ्यात मिळेल, उन्हाळ्यात पाणी आटून जाते.

आपण करण्यासारखे काही:-

    1. गडावर झाडे अजिबात नाहीत त्यामुळे जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यातत्या रुजतील व काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

    2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.

    3. प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.

    4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धा आपले नाव कुठेहीलिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.

  1. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.

कातळामध्ये खोदलेल्या पाय-या

केंजळमाची

====================================================

आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), व श्रीसतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तकेसंग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.

------------------------------------------------------------------

गडावरची काही फुले

कोण कोण गेले होते - आल्हाद, मनीष, शैलेश, प्रमोद, चैतन्य, भालचंद्र

This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers